नवशिक्यांसाठी ध्यान

वर्षानुवर्षे, 'ध्यान' म्हणजे कुणीतरी योगी, निळ्या आकाशाखाली डोंगराच्या माथ्यावर बसला आहे असाच अर्थ घेतला जातो. या प्राचीन अभ्यासाचे नुकतेच सापडलेले फायदे सूचित करतात की ध्यान करणे चांगले आहे - केवळ वैरागी लोकांना करण्यासाठी हे सोडले जाऊ शकत नाही!

लक्ष केंद्रित करण्यामध्ये, रोगप्रतिकारशक्तीमध्ये, रक्ताभिसरण व चयापचय या सर्वांमध्ये सुधारणा, ताणतणाव व वृद्धत्वाच्या लक्षणांमध्ये घट, मेंदूच्या ग्रे मॅटरमध्ये वाढ हे सर्व या फायद्यांमध्ये समाविष्ट आहे. धर्मानं हि एक अशी करण्यासारखी गोष्ट आहे, ज्यात कमी खर्च आणि भरपूर फायदे आहेत. आणि म्हणूनच, आत्ताच्या काळात हि प्राचिन पद्धत लोकप्रियतेच्या शिखरावर आहे यात आश्चर्य नाही.

पण, जे पहिल्यांदाच ध्यान करणाऱ्यांनी याची सुरुवात कशी करावी? या प्रवासाचा प्रारंभ करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी माहित असलेल्या पाहिजेत?

या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, नविन लोकांना मार्गदर्शक ठरू शकेल अशी माहिती इथे दिलेली आहे. 

ध्यान म्हणजे काय?

म्हणजे फक्त डोळे बंद करून बसायचे? की कशावर तरी लक्ष केंद्रित करायचे?

गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात की, "ध्यान हा सखोल मानसिक शांतता मिळवण्याचा; एकाचवेळी सजग आणि जागरूक राहण्याचा मार्ग आहे." ध्यान म्हणजे एकाग्रता या कल्पनेला छेद देताना ते म्हणतात की,"ध्यान म्हणजे लक्ष एकाग्र न करणे."

ध्यानाचे तुमच्यावर काय परिणाम होतात ते पहा.

नविन लोकांना पुस्तकांमधून ध्यान शिकता येईल का?

नाही! "पुस्तकांमधून सिद्धांत मिळतील. पण ते तुम्हाला अनुभव देऊ शकणार नाहीत," ध्यान शिकवणाऱ्या प्राजक्ती देशमुख सांगतात. "पुस्तकी ज्ञानामुळे या सराव पद्धतींबद्दल तुमच्या मनात पक्षपातीपणा येऊ शकतो.

अगदीच नवीन शिकणाऱ्यांसाठी काही सोपी पद्धत आहे का?

हो! दहा मिनिटे डोळे बंद करून, तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. ध्यानाच्या प्रवासाला सुरुवात करताना, ही ध्यान करण्याची सगळ्यात सोप्पी पद्धत आहे. मार्गदर्शक ध्यानांची पण खूप मदत होऊ शकते. 

ध्यान करण्याच्या आधी आणि ध्यान करताना काय काय करावे?

  • खाली काही गोष्टी दिल्या आहेत ज्या पाळल्याने तुमचे ध्यान व्यवस्थित होईल:
  • तुम्ही ज्या जागेत ध्यान करणार आहात, तेथे हवा खेळती राहील याची काळजी घ्या.
  • आसन किंवा खुर्चीवर आरामात बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे सैल व डोळे बंद.
  • मार्गदर्शक ध्यानात सांगितल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करा किंवा श्र्वासाकडे लक्ष द्या.
  • जेंव्हा ध्यान संपेल तेंव्हा शरीराबद्दल सजग व्हा आणि हळूहळू डोळे उघडा.

आपण कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • पोट भरलेले असताना किंवा झोपायच्या आधी ध्यान करु नका.
  • आरामदायक आणि सैलसर कपडे घाला.
  • मोबाईल बंद ठेवा.
  • आजुबाजुला कोणीही तुम्हाला विचलित करणार नाही हे पहा.

ध्यान करताना मनात खूप विचार येत असतील तर काय करावे?

ध्यानाला नव्याने सुरुवात करताना खूप विचार येणे हे स्वाभाविक आहे. त्यांना दाबू नका किंवा गुंतूही नका. त्याच्यापेक्षा, त्यांचं निरीक्षण करायला शिका. ते आपोआपच नाहीसे होतील.